pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत.

0 5 3 1 9 6
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी पहाट हा कार्यक्रम मागील पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो. विकासापासून वंचित असलेल्या समाज घटक दिवाळी सारखा महत्त्वाचा सण आनंदाने साजरा करू शकत नाहीत त्यामुळे दिवाळीत त्यांच्या आनंदाचा भाग व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी पिरवाडी आदिवासी कातकरी वाडी येथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी तसेच आदिवासी बांधवांचे जीवन विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असे प्रतिपादन केले.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य  के. ए.शामा यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमाचा इतिहास सांगितला व विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारून मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन केले तसेच माजी विद्यार्थी व महाविद्यालयाने ही परंपरा टिकून ठेवावी असे सांगितले.  याप्रसंगी पिरवाडी आदिवासी कातकरी वाडी वरील महिलांना एकूण बारा वारी साडी ०७, सहावारी साडी ७०,  पुरुषांना ७५ टॉवेल्स, व एकूण ६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्वच्छता कीडचे वाटप करण्यात आले. यावेळी वाडीवरील सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे,माजी प्राचार्य के.ए.शामा,टी एन घ्यार,विशाल पाटेकर,रोहित पवार, तेजस आठवले इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशी एकूण जवळपास ७५००० च्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी केला गेला.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर,नगरसेविका सायली पाटेकर, रोहित पवार,तेजस आठवले, मंगेश म्हात्रे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 1 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे