pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिध्दार्थ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा……

0 5 3 1 1 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

येथिल सिध्यर्थं कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रभाषा हिंदी दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. राष्ट्रभाषा हिंदी दिनांचे औचित्य साधून विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.शामल धावारे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.या कार्याक्रमा प्रसंगी त्या म्हणाल्या.. हिंदी भाषा ही जीवनाची खरीखुरी महत्वाची भाषा आहे.हिंदी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजेत.येणाऱ्या काळात हिंदी भाषेची गरज मोठ्या प्रमाणात असणार आहे.कारण हिंदी भाषा हि जशी बोलली जाते तशीच लिहली जाते.हिंदी हि मातृभाषा आहे.जिने घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशात एका छत्राखाली आणून भारतीयांना एकत्रित ठेवलं आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे हे होते.आपल्या अध्यक्षिय भाषणात त्यांनी हिंदी भाषा ही सर्वश्रेष्ठ राजा भाषा आहे असे प्रतिपादन केले. राष्ट्रभाषा हिंदी मुळेच भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात इंग्रजी भाषेनंतर विचारांची देवाणघेवाण होत आहे. राष्ट्रभाषा हिंदी मुळेच भारताची ओळख संपूर्ण जगाला होत आहे असे ही आपल्या भाषणांतून व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी विभागाचे प्रा. डॉ.सुदाम पाटील यांनी प्रास्ताविक केले. हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.अनिल वैद्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे,प्रा.वाघमारे एस पी हे उपस्थित होते.विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात काव्य वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, भित्तीपत्रके,प्रश्न मंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करुन हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव देवरे या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रदर्शन प्रा.वाघमारे एस पी यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 1 1 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे