रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे येथे छत्री आणि वह्यांचे दिमाखात वाटप!

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
विद्यार्थ्यांच्या पाठीवर वह्यांचे ओझे कमी करत आणि पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने, इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे येथील विद्यार्थ्यांना छत्री आणि वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन क्लब अध्यक्षा हेतल खोना, क्लब सचिव भारती विक्रमसी, डिस्ट्रिक्ट चेअरमन मोना ग्यानी, असोसिएशन प्रेसिडेंट आणि एनआर विनुथा हरीश, तसेच आय आय डब्ल्यू प्रेसिडेंट इंगेलाँग विंधाम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व नियोजनातून करण्यात आले होते.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.इन्नर व्हील क्लब अध्यक्षा हेतल खोना मॅडम,आकाश फाउंडेशन मुंबई- सेक्रेटरी संजीवनी श्रृंगारे मॅडम,सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, नितीन म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, गणेश पाटील,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष विनायक म्हात्रे, उपाध्यक्षा कविता म्हात्रे, उज्वला पाटील, सदस्या पूनम पाटील, ज्योत्स्ना पाटील,शाळेचे शिक्षक व कर्मचारी अपूर्वा मॅडम, रश्मी मॅडम, सुनीता पाटील आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा हेतल खोना मॅडम यांनी त्यांच्या क्लबच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली.”समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ती मदत करणे आणि निस्वार्थ भावनेने सेवा देणे हाच आमच्या क्लबचा प्रामुख्याने उद्देश आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाबद्दल शाळेच्या शिक्षिका अपूर्वा मॅडम यांनी इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउनच्या अध्यक्षा हेतल खोना मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत आणि प्रेरणा मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.




