जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा सोबतच वंचित बहुजन आघाडीने उरण गांधी चौकात शेंकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने केली.गेली २३ दिवस जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात व २० जुलै रोजी शांततेत सुरू केलेल्या संसद मार्चच्या आंदोलकांवर झालेल्या प्रचंड लाठी हल्ला, अश्रुधाराचा मारा विद्यार्थ्यांनींचे कपडे फाडून केलेली मारझोड याच्या विरोधात महाराष्ट्र भरात आंदोलने झाली.नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजिनामा द्यावा.आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करु नका.शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या अराजकता व खाजिकरण संपवण्यासाठी केंद्रीय स्तरावर विशेष कमिटी गठीत करुन सर्व सामान्य जनतेच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता तातडीने कृती आराखडा तयार करा अशा मुख्य मागण्यांसाठी ही निदर्शने उरण येथे संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भारतीय तरुणांना कॉकरोच संबोधून हिणवले याचा जाहिर निषेध करण्यात आला. आज शिक्षणाची दुरावस्था झाली आहे. डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी पुर्व तयारीची नीट परीक्षेचे पेपर फोडून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे.परीक्षेनंतर २२ नीट परीक्षार्थींची आत्महत्या होणे हे केंद्र सरकारचे अपयश आहे.म्हणून केंद्र सरकारने याचे प्रायश्चित्त घेणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकार हुकूमशाही प्रवृत्तीने विद्यार्थ्यांना, पालकांना छळत आहे.पहिली परीक्षा रद्द करुन पूर्नपरीक्षा झाली त्यातही महाराष्ट्रातील काही मुलांना अपेक्षित मार्क मिळाले नाही याचा अर्थ परीक्षेत लाखो रुपयांची उलाढाल आगोदर केली. आता मुलाची मार्क लिस्ट बदलल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. या संतप्त निदर्शनात विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी,युवक, महिला, शेतकरी , कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड भूषण पाटील, हेमलता पाटील,संजय ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते उरण पंचायत समितीचे विद्यमान सभापती महेश म्हात्रे,माजी उपसभापती वैशाली पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत , कॉग्रेसचे बबन कांबळे, अफशा मुखरी, वंचीत बहुजन आघाडीच्या आम्रपाली गायकवाड, तसेच अम्मे हानी काझी,हमझा तुंगेकर,आईशा मुकरी, कृष्णा पाटील यांनी केंद्र सरकार वर कडाडून टीका केली. जर या आठवड्यात केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर शाळा कॉलेज मध्ये जाऊन या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जाऊन विद्यार्थ्यांचा लढ्यातील सहभाग सुरू केला जाईल याची शासन कर्त्यांनी खूणगाठ बांधावी. उपस्थित आंदोलकांनी आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर पुन्हा केंद्रिय शिक्षण मंत्री राजीनामा द्या. नरेंद्र मोदी सरकार चलेजाव. अशा घोषणा देऊन उरण गांधी चौक दणाणून सोडला.




