pub-7425537887339079
ब्रेकिंग

जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीने आई भवानी मातेचा उत्सव साजरा

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्यात अनेक ठिकाणी देवीच्या यात्रा, उत्सव सुरु आहेत.उरण तालुक्यातील पाले गावात आई भवानी मातेचे जागरण तसेच आई भवानी मातेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी,खजिनदार सल्लागार व सर्व सभासद, ग्रामस्थ तसेच वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य प्रारंभी अविनाश गावंड यांनी आई भवानी मातेच्या मंदिरात स्पीकर साठी दहा हजाराची मदत यावेळी केली. जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली २३ वर्षे जय भवानी मातेचा उत्सव साजरा मोठ्या उत्साह साजरा होत आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच गावातील सर्व कार्यकारी मंडळ माता भगिनी सहभागी होतात.या उत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभत आहे यावर्षी सुद्धा हा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ तसेच जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले चे सर्व सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सल्लागार यांनी विशेष मेहनत घेऊन हा उत्सव यशस्वीपणे, उत्साहाने साजरा केला. आई भवानी माता म्हणजे पालेगाव ची शान आहे. भाविक भक्तांची देवीवर खूप मोठी श्रद्धा आहे.म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहाने भाविक भक्त साजरा करतात

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे