pub-7425537887339079
ब्रेकिंग

हडपसर येथे संत शिरोमणी नरहरी महाराजांचा ८३३ वा जन्मोत्सव उत्साहात संपन्न

0 4 8 4 2 4
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.31

संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ८३३ वा जन्मोत्सव सोहळा हडपसर, पुणे येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरातील सर्व देवदेवतांना पंचामृताने महामस्तकाभिषेक करण्यात आला.
जन्मोत्सवानिमित्त मंदिराचे मुख्य पुजारी अविनाशजी विंचूरकर यांनी ‘नरहरी विजय’ या ग्रंथाचे नऊ दिवसीय पारायण केले. या पारायणामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट,धर्मशाळा (मंगल कार्यालय ) शुक्रवार पेठ , पुणेचे अध्यक्ष अजयभाऊ डहाळे यांच्या वतीने संत नरहरी महाराजांना दोन पोशाख तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांचा पोशाख अर्पण करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १० किलो स्वादिष्ट मसालेभात, मंदिराच्या वतीने दालचा भात, बुंदी आदी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी मोठ्या उत्साहात भजनसंध्येचा कार्यक्रम पार पडला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरेल वातावरणात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे संस्थापक-सचिव भालचंद्र टेम्भुर्णीकर, मुख्य पुजारी अविनाशजी विंचूरकर, विश्वस्त मुकुंदराव सोनार, शंकरराव अडाने, अजय बुऱ्हाडे रत्नापूरकर, संतोष वसंतराव शहाणे, योगेश वाकडकर, तसेच सतीश लोळगे, सौ. लताताई कुलथे, संदेशराव घोडके, नारायणराव पवार, गौरव सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अध्यक्ष काकासाहेब डहाळे, विश्वस्त प्रकाशशेट नगरकर, सतीशशेट कुलथे, नितीन सोनार, संजय डहाळे, तसेच पुण्याचे अध्यक्ष अजय डहाळे, सौ. श्वेताताई अजय डहाळे, सौ. चारूलताताई डहाळे, स्मिता डहाळे, सौ. शैलाताई लोळगे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. ‘संत नरहरी महाराजांचा जयजयकार’ आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 2 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे