ब्रेकिंग
भिक्खु संघाची धम्म शांती रॅली!

0
4
3
8
6
9
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1
समर्थ नगर मधील तक्षशिला बुद्ध विहारांमध्ये दहा दिवसीय श्रामनेर संस्कार शिबिर भारतीय बौद्ध महासभेतर्फे भरविण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सकाळी सात वाजता भिकू संघाची भव्य अशी रॅली बुद्धम् शरणम् गच्छामि,धम्मंग शरणं गच्छामि, संघम शरणम गच्छामि, सबका मंगल होय रे अशा शांतीच्या घोषणा देऊन रॅली काढण्यात आली . यावेळी भिक्खू संघाचे अशोक गंगावणे, तसेच मोरे ताई यांनी फुलांनी स्वागत करून त्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. या शिबिरामुळे समर्थ नगरमध्ये धम्ममय वातावरण निर्माण झाले. बुद्धांचा शांतीचा, अहिंसेचा मार्ग अंगीकारणे हेच आजच्या काळाची गरज आहे.
0
4
3
8
6
9




