काळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश रतन चव्हाण व उपाध्यक्षपदी फजलुद्दीन अकबर शहा यांची बिनविरोध निवड

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या नुकतीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काळेगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण बाबत पालक सभा घेण्यात आली. सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्री गणेश रतन चव्हाण तर उपाध्यक्ष म्हणून फजलुद्दीन अकबर शहा यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून राजेश अशोकराव चव्हाण, शेख महेमूद शेख हमीद, आम्रपाली दीपक इंगळे, सविता विठ्ठल चव्हाण, रईसाबी एजाज शहा, अनिता दादाराव बरडे, ज्योती भानुदास आघाम, अनिता शंकर शिंदे, शिक्षणतज्ञ म्हणून दिनकर आश्रुबा चव्हाण, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी शेख नाजीम शेख शरीफ शिक्षक प्रतिनिधी एस.ई. डोईफोडे तर सचिव म्हणून मुख्याध्यापक दीपक मुळे यांची निवड करण्यात आली. पालकसभेस सरपंच वसंतराव चव्हाण, उपसरपंच वाहेदभाई शेख, मा.उपसरपंच नाजीम शेख,आयाज शहा,छगन इंगळे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समिती स्थापनेसाठी धनंजय मुळे, दीपक मुळे, प्रमोद डोईफोडे ,संजय डोईफोडे मनीषा वायाळ यांनी परिश्रम घेतले.

