pub-7425537887339079
ब्रेकिंग

मराठी माध्यमाच्या अनिकेत ऊखर्डेची “राष्ट्रीय पातळीवर” उत्तुंग भरारी.

0 5 0 4 2 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

टेंभूर्णी शहराचे भूमीपूत्र अनिकेत दत्तात्रय ऊखर्डे यांनी कष्टाला कतृत्वाची जोड देऊन FUNDS-INDIA या आंतरराष्ट्रीय
नामांकित कंपनीत वार्षिक ४० लाखांच्या पॅकेजवर नियुक्ती मिळवत
​ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे यश अधोरेखित केले आहे.
जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात, हे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील भूमीपुत्र अनिकेत उखर्डे याने सिद्ध करून दाखवले आहे.जेंव्हा समाजात आपल्या आसपास कित्येक तरूण नोकरी नाही म्हणून हताश होतात, कित्येक तरूण तासंनतास फक्त मोबाईल, इंटरनेट, इंन्स्टाग्राम,व्हाट्सअप, स्नॅपचॅट, च्या मोहपाशात अडकून पडतात, चुकीच्या सवयीला बळी पडतात, कळत न कळत अनेकजन व्यसनाच्या आहारी जातात, अशा सर्व तरूणां समोर अनिकेतचे यश डोळे दिपवुन टाकणारे वाटते,त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
​शिक्षणाचा मजबूत पाया, घरातील अभ्यासाचे वातावरण अनिकेतला लहान पणा पासून लाभले, कारण टेंभूर्णी येथील श्रीमती. जे. बी. के. विद्यालयात सहशिक्षक असलेले दत्तात्रय ऊखर्डे सर यांचा अनिकेत हा थोरला मुलगा शांत, संयमी, अभ्यासात अतिशय हुशार, साधे रहाणीमान, मात्र विचाराची उंची आकाशाला गवसणी घालणारी, मितभाषी
अनिकेतचे प्राथमिक शिक्षण इ. १ ली ते ४ थी पर्यंत मराठी माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यालय , देऊळगावराजा येथे पूर्ण झाले. त्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षण इ. ५ वी ते ७ वी इंग्रजी माध्यमातून आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, देऊळगावराजा येथून घेतले. त्याने माध्यमिक शिक्षण, सहकार विद्या मंदिर बुलढाणा (सी.बी. एस.इ.)येथून पूर्ण केल्यानंतर त्याने उच्च माध्यमिक शिक्षण राजे संभाजी विद्यालय, जवखेडाठेंग येथून विज्ञान शाखेतुन पूर्ण केले.
​शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार, संगणक तत्रज्ञानात आवड असलेल्या अनिकेतने छत्रपती संभाजीनगर येथील “नारायणा” क्लासेसमधून १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवत राष्ट्रीय स्तरावरील ‘JEE मेन्स’ परीक्षेत ९८ पर्सेंटाईल गुण संपादन केले. या गुणांच्या जोरावर त्याची देशातील नामांकित “राष्ट्रीय संस्था” ट्रिपल आयटी, लखनौ उत्तर प्रदेश (IIIT Lucknow) येथे माहिती तंत्रज्ञान (IT) शाखेत बी.टेक साठी निवड होऊन प्रवेश निश्चित झाला.
अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असतांनाच महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून अनिकेतची बंगळुरू येथील नामांकित ‘एपीफाय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ (Epifi Technologies Pvt. Ltd.) या कंपनीत १८ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ म्हणून निवड झाली होती.व तेथूनच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान क्षेत्रात अनिकेतने अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवत,वरिष्ठांचे मनं जिंकले. व केवळ एका वर्षात ‘सिनियर अभियंता’ पदी पदोन्नती मिळवली.
​त्यानंतर सुमारे अडीच वर्षांच्या उल्लेखनीय अनुभवानंतर अनिकेतची आता बंगळुरू येथील FUNDS-INDIA फायनान्शियल सर्व्हिसेस’मध्ये “संगणक अभियंता” म्हणून वार्षिक तब्बल ४० लाखांच्या पॅकेजवर नियुक्ती झाली आहे.
​ग्रामीण भागातील अनिकेत ऊखर्डेने कठोर अभ्यास करून,शिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.अनिकेतच्या या यशाबद्दल, टेंभूर्णी येथील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अनिकेत ऊखर्डे चे अभिनंदन केले आहे पंचक्रोशीत अनिकेत ऊखर्डेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या पुढील दैदिप्यमान वाटचालीस त्याच्या गुरूजनांनी व आप्तेष्ट स्नेहीजनांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल, नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर सर, संचालक तथा माजी सचिव प्रेमसुख काबरा, संचालक विश्वनाथ सांगोळे, सचालक प्राध्यापक दत्ता देशमुख, संचालक प्रदीप मुळे, प्रसिद्ध चित्रकार संतोष आवटी, नसीम शेख, शांताराम गोपने, रशीद पठाण, अर्शद शेख, संतोष घोडके, बालाजी मगर,डॉ.आनंद जाधव, दिनकर उखर्डे, वासुदेव क्षीरसागर, शेख मॅडम, पाटील मॅडम, ससाने सर, राजू डोमळे, लंबे मॅडम, आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 4 2 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे