pub-7425537887339079
ब्रेकिंग

SIR अभियानात खानापूरच्या मुख्याध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी; गिते सरांचा जिल्हास्तरावर गौरव

0 4 7 1 0 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 25

मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान २०२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानापूर येथील मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण नारायण गिते यांच्या नावाचा गौरवपूर्ण समावेश झाला आहे. या उल्लेखनीय यशामुळे खानापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार यादीचे पुनरिक्षण हे अत्यंत जबाबदारीचे व वेळेत पूर्ण करावयाचे काम असून, गिते सरांनी हे कार्य शंभर टक्के अचूकता, प्रभावी नियोजन, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडले. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या गिते सरांनी शालेय जबाबदाऱ्यांसोबतच शासकीय कामकाजही तितक्याच कार्यक्षमतेने पार पाडत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशामागे शाळेतील शिक्षकवृंद, विशेषतः सहशिक्षिका श्रीमती कायंदे मॅडम यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्यही महत्त्वाचे ठरले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गिते सरांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मंदिर समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच समस्त खानापूर ग्रामस्थ यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यामुळे गावाचा नावलौकिक वाढला असून, भविष्यातही शिक्षण क्षेत्र आणि समाजकार्यात अशीच उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी ते सदैव अग्रेसर राहावेत, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 1 0 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे