pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू; नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5

उरण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि रस्त्यांवरील शिस्तीसाठी नवी मुंबई पोलीस, उरण वाहतूक शाखेने सम-विषम तारीख पार्किंग पद्धत लागू केली आहे. उरण नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सम आणि विषम तारखांचे पार्किंग बोर्ड लावण्यात आले असून नागरिकांनी त्यानुसारच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक शाखा यांनी केले आहे. नव्या नियमानुसार, ज्या ठिकाणी सम तारखांचे म्हणजेच २, ४, ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या सम तारखांनाच वाहने पार्क करता येतील. तर जिथे विषम तारखांचे म्हणजेच १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१ या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या विषम तारखांनाच पार्किंगची परवानगी असेल. या बोर्डांशिवाय इतर ठिकाणी किंवा चुकीच्या दिवशी वाहन पार्क केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. उरण शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेशिस्त पार्किंगमुळे आपत्कालीन वाहने, बस आणि रुग्णवाहिकांना मार्ग मिळणे कठीण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन उरण नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. सम-विषम पार्किंगमुळे रस्त्याच्या एकाच बाजूला वाहने लागतील व दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी राहील, त्यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून उरण शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल, असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे