चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवर नियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

जालना/प्रतिनिधी,दि.4
बदनापूर तालुक्यातील चनेगाव ग्रामपंचायतच्या नियोजनामुळे भरउन्हाळ्यातही पाणी वेळेवर मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात सध्या वेळेच्या वेळी टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने आज घडीला तरी गाव पाणी टंचाई पासून दूर असल्याचे सरपंच कविता मुटकुळे-पाटील यांनी सांगितले. येथील सरपंच कविता मुटकूळे-पाटील यांनी बोलताना सांगितले की, गावात आज मे महिन्यातही गावकर्यांना पाणी मिळत असल्याने गावात कुठेही पाणीटंचाई नाही तसेच योग्य नियोजन व ग्रामपंचायत सदस्याच्या सहकार्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी यंदा भटकंती करावी लागत नाही. परंतु इतके होऊ नये गावातील काही जण पाणी टंचाईचा आव आणत आहे. गुत्तेदाराच्या दुर्लक्षामुळे जलजीवन योजनेचे काम रखडले तसेच चनेगावासाठी जलजीवन योजना मंजूर आहे. सदरील योजनेचे काम ही काही प्रमाणात झाले. त्यानंतर हे काम जलदगतीने करण्यात यावा यासाठी सरपंच व गावकर्यांनी वेळोवेळी निवेदन संबंधित कार्यालयात देवून आंदोलनही केली आहे. जलजीवन योजनेचे काम होऊ शकले नाही. अशाही परिस्थितीत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या समन्वयेमुळे गावात टँकरद्वारे वेळेवर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने सध्या तरी गावात पाणी टंचाई निर्माण झालेली नाही,असे सरपंच कविता मुटकूळे- पाटील यांनी सांगितले. ००००००००० फोटो ओळी….. १ ते २- चनेगावात टँकर आल्यानंतर ते पाणी सर्वांना पुरेल असे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.




