pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना व बुलढाणा जिल्ह्यात हजारो वृक्षलागवडीचा उपक्रम युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया व सह्याद्री देवराई फाउंडेशनची संयुक्त मोहीम

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22

पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया (UGFI) व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालना व बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व बीजारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळा परिसर, गायरान जमीन, सार्वजनिक मोकळ्या जागा तसेच ग्रामीण भागांमध्ये हजारो वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. लोकांनी आधी पृथ्वीला ओसाड केलं, आता पुन्हा हिरवळ शोधत आहेत. मानवी सातत्य खरंच विलक्षण असतं. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीत सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास, सामाजिक जबाबदारी आणि युवकांच्या सहभागातून मोठी हरित चळवळ उभारण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. यावेळी सयाजी शिंदे यांना १० प्रकारचे फॉरेस्ट सीड्स, एकूण १० किलो भेट स्वरूपात देण्यात आले. या बियांच्या माध्यमातून विविध भागांत बीजारोपण करून नैसर्गिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षनिर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले. आगामी काळात जालना व बुलढाणा जिल्ह्यांत स्थानिक युवक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर वनराई उभी करण्यात येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यात नर्सरी उभारण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला असून, विविध प्रजातींची रोपे तयार करून हरित अभियानाला अधिक गती देण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांनी या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या. युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश बनकर यांच्यासह विशाल नवले, अनुराग जाधव व करण दंभेदार हे या मोहिमेसाठी विशेष प्रयत्नशील असून, दोन्ही जिल्ह्यांत हरित परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. काही जण फक्त फोटोसाठी रोप धरतात. इथे निदान ते लावण्याचं तरी बोललं जातं, हीही प्रगतीच.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे