संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14
टेंभुर्णी तालुका जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य प्रा सतीश जाधव सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाग्यश्री जाधव मॅडम या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पंडित मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी उखर्डे मॅडम यांनी केले. सर्वप्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रियांश जाधव, विवान सुग्रामकर ,अन्वी काठोळे ,आयुष वाघ, भूषण वाघ यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिना शेख मॅडम, शीला जाधव मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.




