pub-7425537887339079
ब्रेकिंग

इंग्रजी इलुकेशन कॉम्पिटिशन मध्ये जनजागृती विद्यालय शेवगा चे तालुकास्तरीय यश

0 4 8 0 9 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

जनजागृती माध्यमिक विद्यालय, शेवगा येथील इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कु. इरम अख्तर पठाण हिने इंग्रजी इलुकेशन कॉम्पिटिशन मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेच्या बीट स्तरावर जनजागृती माध्यमिक विद्यालय शेवगाने प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तरीय फेरीसाठी पात्रता मिळवली आहे
विद्यार्थिनीने इंग्रजी विषयातील ज्ञान, आकलन शक्ती, भाषिककौशल्य व आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत हे यश संपादन केले आहे. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत अजून एक मानाचा तूरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर मामा पवार, मुख्याध्यापक श्री.मुळे सर,शिक्षकवृंद व पालकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, तालुकास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.गणेश मेहेत्रे सर यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे