pub-7425537887339079
ब्रेकिंग

मुख्यमंत्री मत्सयसंपदा योजना अंतर्गत 24 योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्चाचे आवाहन 

0 5 2 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

राज्यातील मच्छिमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने डिजिटल सेवेचे नवे दालन खुले केले आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना (CMMSY) राबविण्यात येत असुन विभागाच्या 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता महाडीबीटी 2.0 प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दि. 28 ऑक्टोबर 2026, बुधवार रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाडीबीटी 2.0 प्रणाली या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध लाभार्थीभिमुख योजनांची अंमलबजावणी आता अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक व पुर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांचा लाभ थेट मत्स्यव्यावसायिकांपर्यंत सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचविणे हा उद्देश असुन लाभार्थ्यांकरीता 24 योजना थेट ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता येणार असुन लाभार्थ्यांना अनुदान थेट आधार-संलग्न बॅंक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ होणे, कागदपत्रांची संख्या कमी होणे आणि सेवांचा जलद निपटारा होणे यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ 

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbt2.maharashtra.gov.in/othersया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे