pub-7425537887339079
ब्रेकिंग

तळा ज्युनियर कॉलेजच्या गुणवत्तेची १२ वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग झेप

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.2

तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये आपल्या देदीप्यमान यशाची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयाने एकूण ९६.६९ टक्के निकालाची नोंद करत तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे, विज्ञान शाखेने शंभर टक्के यश संपादन केले असून कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या शाखावार निकालावर नजर टाकल्यास, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेने ९७.१८ टक्के तर कला शाखेने ९० टक्के निकालासह घवघवीत यश मिळवले आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कामगिरीने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विज्ञान शाखेतून अनुष्का उत्तरेश्वर सातपुते व भूमिका प्रकाश चौधरी या विद्यार्थिनींनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. सृष्टी दिपक काळे हिने द्वितीय, तर शर्वरी जगदीश शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवून आपले यश अधोरेखित केले. वाणिज्य शाखेतून श्रावणी दिलीप शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून, सोनल संदीप अडखळे द्वितीय तर मंथन धनाजी मासक याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कला शाखेतून रोहित संदीप माळी याने प्रथम, भावेश अमित आर्डे याने द्वितीय आणि श्रेया गोविंद गोळे हिने तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री. महेंद्रशेठ कजबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री. श्रीराम कजबजे, प्राथमिक विद्यामंदिरचे चेअरमन श्री. महादेव बैकर आणि पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री. बी. के. पटेल यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राचार्य श्री. दिलीप ढाकणे, पर्यवेक्षक श्री. महादेव लोकरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तळा तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून पालकांनीही महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध वातावरणाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे