डिझेल पेट्रोल टंचाई मुळे मिरची उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात! सरकारने व्यापार्यांना सवलत देवुन किंवा हमीभावाने हिरवी मिरची खरेदी करून निर्यात करण्याचे नियोजन करावे! – बोरसे गुरुजी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.26
जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसर हा मिरची पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी 45°C ते 48°C तापमानात, एप्रिल-मे च्या रखरखत्या उन्हात राबतो.आलेला माल विक्रि होईल का नाही डिझेल पेट्रोल टंचाई मुळे भोकरदन तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात!एक एकर हिरवी मिरची उभी करण्यासाठी आज शेतकऱ्याला *जवळपास 1 लाख रुपये खर्च येतो. खर्चाचा ताळेबंद 1. रोपे 15,000 ते 20,000 रु. 2. बेड, मल्चिंग, ठिबक 25,000 रु. 3. मशागत, खते, औषधे 30,000 रु. 4. मजुरी, खुरपणी, तोडणी 20,000 रु. 5. डिझेल-पेट्रोल : टंचाईमुळे तोडणीचा दर वाहतूक खर्च वाढला. आजची परिस्थिची खर्च तर करुन बसलो. डिझेल-पेट्रोल टंचाईमुळे वाहतूक ठप्प आहे. व्यापारी बांधावर यायला तयार नाहीत. खर्च वजा जाता बाजारात सरासरी किमान 50 रु. किलोने विक्री होईल अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे.व्यापार्यांनी मिरची खरेदि केली नाही तर माल पडुन राहण्याची भाव कमी होण्याची भीती आहे. अन्यथा शेतात उभी असलेली हिरवी मिरची लाल होऊन वाया जाणार! शेतकऱ्याने कर्ज काढून, सोने गहाण ठेवून लावलेला 1 लाख रुपये एकराचा खर्च कसा निघणार?* शेतकर्यांचा माल योग्य दराने विक्री होण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.”दुनिया इकडे तिकडे झाली तरी चालेल, पण *शेतकऱ्याचा माल पडून राहिला नाही पाहिजे.*” सरकारकडे यावर सोल्युशन काय आहे? 1. हमीभावाने खरेदी सुरू करा : हिरव्या मिरचीला किमान 50 रु./किलो हमीभाव जाहीर करून नाफेड/महाएफपीसी मार्फत थेट खरेदी सुरू करा. भोकरदन, जाफराबाद येथे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा. शेतकरी उत्पादक कंपन्यांची अनुदानावर सेवा घ्या! 2. निर्यातीसाठी विशेष व्यवस्था : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने हिरवी मिरची आखाती देश, युरोप येथे निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सबसिडी द्यावी. शेतमाल सडू देण्यापेक्षा परदेशी पाठवून डॉलर कमवा. 3. डिझेल-पेट्रोल पुरवठा सुरळीत करा : शेतमाल वाहतुकीसाठी कृषी कार्डावर सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्या. टँकरने प्रत्येक गावात तालुक्यात पुरवठा करा. 4. पीक विमा व कर्जमाफी : अवकाळी पाऊस डिझेल टंचाईमुळे नुकसान झाल्यास मिरची उत्पादकाला हेक्टरी 50,000 रु. मदत जाहीर करा. पीक कर्जाचे व्याज माफ करा. 5. प्रक्रिया उद्योग उभारा : भोकरदन MIDC मध्ये मिरची पावडर, सॉस, लोणचे युनिट उभारण्यासाठी 100% अनुदान द्या. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य द्या. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला भिकारी करू नका. आज जर डिझेल टंचाईमुळे व्यापार्यांनी मिरची खरेदी केली नाही आणि सरकारी पातळीवरून मिरची खरेदी साठी उपाय योजना झाली नाही, तर कर्जबाजारी शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.भोकरदनच्या पुढार्यांनी व्यापारी नियमीत येण्यासाठी मध्यस्थी व उपाय करावा. आम्ही नेत्यांची हुजरेगिरी करत नाही, आम्ही जाब विचारतो.वेळीच उपाय करा नुकसान झाल्यावर भोकरदनचा शेतकरी पेटून उठला तर त्याची धग मंत्रालयापर्यंत पोहोचेल.


