pub-7425537887339079
ब्रेकिंग

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ‘ज्ञानज्योती’ व ‘आधार’ योजनांच्या प्रवेशाला सुधारित वेळापत्रक

0 4 8 4 6 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

सन २०२६-२७ करीता राज्यातील उत्तर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व स्वयम् योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनस्तरावरून प्राप्त झाले असून त्यानुसार वरील योजनांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करावयाचा असल्यास इच्छुकांनी दिनांक 15 सप्टेंबर, 2026 पर्यंत अर्ज करावा. या योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करावयाचा असल्यास जालना महानगरपालिका हद्दीअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयम् योजना (NT-C) व आधार योजना (OBC, VJNT, SBC) या योजनांसाठी दिनांक 15 सप्टेंबर, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील व्यावसायीक व अव्यावसायीक अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 15 सप्टेंबर, 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर व इतर मागास बहुजन कल्याण, जालना या कार्यालयात अर्ज सादर करावीत. तसेच स्वयम् योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 6 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे