pub-7425537887339079
ब्रेकिंग

नांदेड विधानपरिषदेसाठी पहिला अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने; राजकीय वर्तुळात खळबळ

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

 हदगाव/प्रभाकर डुरके,दि.26

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिलाच उमेदवारी अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने अधिकृतरित्या घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी अर्ज उचलत आष्टीकर यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या हालचाली सुरू असताना, कृष्णा पाटील आष्टीकर यांनी घेतलेला हा आक्रमक राजकीय निर्णय अनेक दिग्गज नेत्यांसाठी धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि वाढता जनसंपर्क यामुळे आष्टीकर यांच्या संभाव्य उमेदवारीकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, अद्याप त्यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही पहिलाच अर्ज त्यांच्या नावाने घेतला गेल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पाटील आष्टीकर हे पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, अनेक स्थानिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नांदेडच्या राजकारणात आता नवीन समीकरणांची सुरुवात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आष्टीकर यांच्या प्रत्येक हालचालीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत त्यांच्या भूमिकेमुळे विधानपरिषद निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रवींद्र चव्हाण हे एकत्र आल्यास नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तिन्ही नेत्यांची राजकीय ताकद, संघटन क्षमता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव लक्षात घेता विधानपरिषद निवडणुकीत नवे राजकीय गणित तयार होऊ शकते, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. नांदेडच्या राजकारणात शांतपणे पण आक्रमक पद्धतीने तयारी करणारे नेतृत्व म्हणून कृष्णा पाटील आष्टीकर यांचे नाव पुढे येत असून, त्यांच्या या पावलामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे