pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथील विद्यार्थ्यांचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्ते सन्मान

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.19

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन द्वितीय क्रमांक मिळवला. यामध्ये भाग्यश्री शिंदे ,स्नेहल जाधव व सार्थक खुळे या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. गणित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरणचा कार्यक्रम दिनांक 17/ 4 /2026 ला कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जालना येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा परिषदेच्या प्रा . शिक्षणाधिकारी मा.संगीता भागवत मॅडम यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कृष्णकांत कनवारिया साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी मा.श्री संजयजी कायंदे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते .या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथील विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री डॉ. कृष्णकांत कनवारिया साहेब जिल्हा परिषद जालना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे व या परीक्षेसाठी मेहनत घेणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कांगणे सहाय्यक शिक्षक श्री निलेश पिसे आणि श्री पंजाब दांदडे यांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री गोविंद चव्हाण साहेब ,शिक्षण विस्ताराधिकारी मा.श्री के .जी. राठोड सर केंद्रप्रमुख मा.श्री एल. जे .खरात सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती दूधा ग्रामपंचायत कार्यालय दुधा व पालकांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे