pub-7425537887339079
ब्रेकिंग

अल्पसंख्यांक संरक्षण कायद्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनास जाहीर पाठिंबा – प्रा. अमर शेख

अल्पसंख्यांक समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

राज्यासहित देशभरात अल्पसंख्यांक समाजावर गेल्या काही वर्षांपासून सतत होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अधिवेशन काळात दिनांक 22 जून पासून अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, तर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा या समितीचे सदस्य प्रा. अमर शेख यांनी जाहीर पाठिंबा देत असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजातील एका मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर वारंवार अन्याय,अत्याचार करणे, मॉब लिचिंग करणे, मुस्लिम समाजाच्या बाहेरच्या स्त्रियांनी बुरखा घालून ब्राम्हण गल्लीत मांस फेकून मुस्लिम समाजाची जाणीवपूर्वक बदनामी करून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणे, मुद्दामहून धार्मिक स्थळांची मोडतोड करून वातावरण खराब करणे,जाफराबाद आणि परळी सारख्या ठिकाणी अमानुष मारहाण करून मर्डर करणे,सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी जाणीवपूर्वक बेताल वक्तव्य करणे अशा असंख्य घटना दररोज या देशात घडत असतात,यापासून कुठे तरी समाजाचे संरक्षण झाले पाहिजे आणि ॲट्रासिटी सारखा कायदा झाला पाहिजे यासाठी गेल्या काहीं महिन्यांपासून निमंत्रक ॲड.प्रा. इलियास इनामदार यांच्या प्रयत्नाने व मुजतबा खान सर आणि शेख मुसा सर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या मार्फत बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात समितीने उपोषणे,आंदोलने व दौरे केली आहेत आणि हाच लढा मोठ्या प्रमाणावर उभा करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात राज्यभरातील अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा समितीचे सदस्य प्रा. अमर शेख यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे