pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिलीप वाघ यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5

जाफ्राबाद तालुक्यातील वरुड येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघ पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्याबद्दल ‘महाराष्ट्र साई जीवनगौरव’ तसेच ‘समाज भूषण’ पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथे शनिवारी पार पडलेल्या भव्य ‘महाराष्ट्र साई पद्मश्री’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सन्मानचिन्ह, शाल आणि प्रमाणपत्र देऊन वाघ यांचा गौरव करण्यात आला. दिलीप वाघ पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी आणि परिसरात समाजहिताचे विविध उपक्रम राबवले आहेत. भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, गरजू नागरिकांना मदत करणे, तसेच वंचित घटक, गरीब आणि आपत्तीग्रस्तांना वेळोवेळी सहाय्य करणे यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सतत दिसून येतो. पुरस्कार स्वीकारताना दिलीप वाघ पाटील यांनी साईबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही समाजासाठी अधिक जोमाने कार्य करणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल नेवासा तसेच शिर्डी परिसरातून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे