pub-7425537887339079
ब्रेकिंग

निर्मलाताई रावसाहेब पा. दानवे इंटरनॅशनल स्कूल, रजापूरची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी

तीन विद्यार्थी गुणवंत यादीत

0 4 7 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी,दि.31

अंबड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) 2026 च्या अंतरिम गुणवत्ता यादीत निर्मलाताई रावसाहेब पा. दानवे इंटरनॅशनल स्कूल, रजापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत वंश शिवाजी जावळे याने 192 गुण (64%) मिळवत केंद्रातून व शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तुषार शैलेश पल्लोड याने 154 गुण (52%) मिळवत द्वितीय, तर तन्मय शैलेश पल्लोड याने 144 गुण (48%) मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या तिन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता मिळवून शाळेची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. शाळेमध्ये नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय मार्गदर्शन, वैयक्तिक अभ्यास नियोजन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पांढरे, संचालक आर. आर. वैद्य, आशाताई पांढरे,मुख्याध्यापिका पुष्पा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशासाठी शाळेतील पिवळ एस.एस.,स्वाती मॅडम, रुणाली मॅडम, कावेरी उकिरडे मॅडम,शिवानी पिवळ मॅडम, कविता देशमुख मॅडम, उषा काळमकर मॅडम, मनीषा खंड मॅडम, श्वेता गिरी मॅडम, आरती अहिरे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “गुणवत्ता हीच आमची ओळख” हे शाळेचे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सार्थ ठरले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक, स्पर्धात्मक व सर्वांगीण विकासात शाळा नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास पालक व नागरिकांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे