श्रीमती जे.बी के विद्यालयाच्या ऋतुजा खांडेभराडची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
वैष्णवी सुरेश साळुंखे व युवराज सुरेश साळुंखे यांची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27
नवभारत शिक्षण संस्था टेंभूर्णी द्वारा संचालित श्रीमती. जे. बी. के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची चालु शैक्षणिक वर्षात विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील क्रिडा स्पर्धेत विजयी घौडदौड सुरू असुन या अगोदरच्या शैक्षणिक वर्षातही श्रीमती.जे.बी.के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ओमराज कृष्णा उखर्डे, ऋतुजा शांताराम पवार,सोहम शांताराम पवार, तेजस सोनाळकर, मारोती देठे, अजय साबळे, अनुष्का कामे,निकिता कल्याणकर, भक्ती साळवे, या सारख्या किती तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत व राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धेत चमकदार कमगिरी करून विद्यालयाचे नाव उज्वल केलेले आहे. नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीमती. जे. बी.के.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण क्रिडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केलेला आहे. हिच विजयी परंपरा इयत्ता बारावीतील विद्यार्थीनी कु. ऋतुजा विलास खांडेभराड हिने पुढे कायम ठेवली आहे.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी ,यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे आयोजित विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन,एकोणीस वर्ष वयोगटा मध्ये गोळाफेक व हॅमर थ्रो,या दोन क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असुन राज्यस्तरावरील होणार्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.त्यामुळे विभागाचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी कुमारी. ऋतुजा विलास खांडेभराड हिला मिळाली आहे. ग्रामिण भागातील एका शेतकरी सामान्य कुटुंबातील, ऋतुजाने अथक मेहनत, कठोर परीश्रम सराव करत गोळाफेक व हॅमर थ्रो या क्रिडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. सातत्यपूर्ण सराव करून तिने हे यश संपादित केले आहे. ऋतुजा खांडेभराड हिला श्रीमती जे.बी.के. विद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख कैलास भुतेकर सर,क्रीडा मार्गदर्शक राजेश शेवाळे सर,प्रशिक्षक सोमनाथ मघाडे,यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले असुन ऋतुजाला आपल्या आई-वडीलाचा व कुटुंबाचा सुद्धा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. तसेच विद्यालयातील कु. वैष्णवी सुरेश साळुंखे व युवराज सुरेश साळुंखे यांनी सुद्धा जिल्हा स्तरावरील कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावुन विभागीय स्तरावरील होणार्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ते जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. कु.ऋतुजा खांडेभराडच्या विभागीय स्तरावरील चमकदार कामगिरी बद्दल व राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे या विजयी खेळाडू विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा विद्यालयात भव्य सत्कार सोहळा घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.संजय काबरा. उपाध्यक्ष.जमीर शेख सर,सचिव.सत्यनारायण सोनी, कोषाध्यक्ष. सुभाष राठी, ज्येष्ठ संचालक. मधुकरराव निकम संचालक. विधीतज्ञ. प्रेमसुख काबरा, संचालक. प्रदीप काबरा, प्रल्हाद टेंभूर्णीकर,प्रदीप मुळे, संचालक. प्रा.दत्ताराव देशमुख, संचालक. विश्वनाथ सांगुळे, प्राचार्य. संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक. भिवसन ससाणे, ज्येष्ठ शिक्षक. रमेश इंगळे, विष्णू जाधव, राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे, उज्वला आवटी, एफ. ए.शेख, माधुरी पाटील,मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, निशिगंधा राजपूत, विजया शिल्लार, प्रा. सुनील बनसोडे, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ.अरुण आहेर, प्रा. रामदास भांगे, प्रा. कैलास जाधव, प्रा. गजानन धोटे, प्रा.डॉ. आनंद जाधव, दिनकर ऊखर्डे, समाधान कांबळे, दत्ता उखर्डे, वसुदेव क्षीरसागर, सुनिल सकुंडे राजूभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दीपक देशमुख, आदींनी वैष्णवी साळुंखे युवराज साळुंखे व ऋतुजा खांडेभराडचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयातील या तिनही विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील चमकदार कामगिरीबद्दल पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव होत आहे.



