pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी जिल्हा परिषद शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तके आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गुरुजी शाळेत येण्यापूर्वीच विद्यार्थी गेटवर हजर होते. त्यांनी गुड मॉर्निंग सर म्हणत शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचे कुलूप उघडताच मुख्याध्यापक अशोक हरकळ आणि शिक्षिका प्रणिती वाहुळे यांनी इयत्ता पहिलीतील नव्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना नवकोरी पाठ्यपुस्तके दिली. वर्गात प्रवेश करताच शिक्षिका मंगला साने यांनी काढलेल्या सुरेख रांगोळ्या आणि चित्रांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. कला शिक्षक देशपांडे आणि सानप यांनी गाणी व कविता सादर केल्या. त्यानंतर शिक्षक आनंदा माने यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत नेऊन तंत्रज्ञानाची माहिती दिली. सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना रांगेत बसवून पोषण आहार देण्यात आला. तसेच शिक्षक देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. हसत खेळत शिक्षण या सूत्रानुसार पहिल्या दिवसाची सांगता देशभक्तीपर गीते आणि कवितांनी झाली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी जाफ्राबाद गटशिक्षण विस्तार अधिकारी राम खराडे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, रावसाहेब अंभोरे, गौतम चंदनशिवे, रेखा जमधडे आणि मुक्ताबाई जमधडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे