मुख्यमंत्री बळीराजा शेत पादण रस्ते योजना समितीवर दत्तू पं%A

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.23
जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित यांची मुख्यमंत्री बळीराजा शेत पादण रस्ते योजना भोकरदन जाफ्राबाद विधानसभा क्षेत्रीय समितीवर आमदार निवड समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पादण रस्ते योजना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये शेतरस्त्यांच्या अभावामुळे शेतमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेती रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
दत्तू पंडित हे सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासाच्या कामात सक्रिय म्हणून ओळखले जातात. गावपातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीमुळे भोकरदन जाफ्राबाद विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रलंबित शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दत्तू पंडित यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, गोविंद पंडित ,माजी जिल्हा परिषद सदस्य शालिक म्हस्के,राजेश चव्हाण,देविदास देशमुख,तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,मधुकर गाढे,मधुकर देठे, उद्धव दुनगहू, सरपंच बाबासाहेब सवडे,विजय परिहार, ज्ञानेश्वर बनकर,दिनकर पंडित,दादाराव सवडे, शंकर सवडे, रामेश्वर सवडे, बि. डी. सवडे,प्रकाश कापसे,गंगाधर खरात, योगेश बनकर, प्रभू बनकर, अशोक बनकर,मनोज दुनगहू, शालिक शिंदे,बळीराम जगताप, बद्री जगताप गजानन देठे,अशा विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



