pub-7425537887339079
ब्रेकिंग

सेवेचा सुवर्णप्रवास पूर्ण; जाफ्राबाद आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा गौरव

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद आगारात प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या तीन कर्मचाऱ्यांचा मंगळवारी भावपूर्ण वातावरणात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी वाहक सुधाकर नारायण राऊत, स्वच्छक म. साबेर म. जमाल आणि वाहतूक नियंत्रक अशोक सुपडा बारोटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात तिन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांप्रती असलेल्या सेवाभावाचे कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे जाफ्राबाद आगाराच्या प्रगतीत मोलाचे योगदान मिळाल्याचे सांगत त्यांची कार्यशैली नव्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी व वरिष्ठांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महामंडळातील सेवाकाळ हा आयुष्यातील अभिमानास्पद प्रवास असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समस्त जाफ्राबाद आगार कर्मचारी वृंद यांच्या वतीने आयोजित या समारंभात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे