समर्थ महाविद्यालय, जाफ्राबाद इथे भारत पसारा कायद्या अंतर्गत सुरक्षा रक्षक, पदासाठी कायदेशीर भरतीला भव्य प्रतिसाद

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 27
सुरक्षा डिपार्टमेंट मधे 60 वर्षा पर्यंत परमैनेंट नौकरी ची सुवर्ण संधी,भारत सरकारच्या सूक्ष्म लघु मंत्रालय उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा कायदा 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक सुशिक्षित तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मानांकनप्राप्त , एस एस सिक्योरिटी प्रा.लिमिटेड आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ जाफ्राबाद संचालित, समर्थ महाविद्यालय, प्लेसमेंट सेल, जाफ्राबाद . ता. जाफ्राबाद . जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने,दिनांक 21ऑक्टोबर 2026 ते 24ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज संस्थेचे सचिव डॉ. संजय गौतम सर यांच्या हस्ते उदघाटन झाले. आणि नियुक्त झालेल्या युवकांना लगेच नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी पत्रकार श्री गजानन उदावंत तसेच सहसचिव केदार गौतम यांनी युवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राचार्य श्री मुकुंदा राऊत सर, मुख्याध्यापक संदीप पंडित सर, व सर्व शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर. सरकारी सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा,सरकारी ESIC द्वारे सम्पूर्ण परिवरास मेडिकल, ग्रॅजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र किमान वेतन नियमाप्रमाणे मिळणार आहे जे 16 हजार ते 24हजार मिळेल, व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना पुणे विभाग, छ. संभाजी नगर विभाग, अहिंल्यानगर विभाग मधेच नौकरी दिली जाणार आहे,
ही भरती प्रक्रिया दि.21 ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर 2026 पर्यंत सकाळी ८ ते दुपारी1 पर्यंत समर्थ महाविद्यालय जाफ्राबाद ता. जाफ्राबाद , जिल्हा. जालना येथे सुरू राहणार आहे. तरी या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी घ्यावा.
भरती साठी :पात्रता *1)शिक्षण :युवक हा कमीत कमी 10 वी पास असावा. 2)वय:किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष. 3) उंची:165सेमी पेक्षा जास्त. 4)वजन 48किलो पेक्षा जास्त. युवक हा शारीरिक आणि मानसिक फिट असावा. भरतीसाठी कागदपत्रे:1)आधार कार्ड झेरॉक्स 2) ,10/12वी /ग्रॅज्युशन चे मार्कशीट पैकी 1 झेरॉक्स. 3) पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे.4)रेजिस्ट्रेशन फी 500रुपये (फक्त निवड होणाऱ्या युवकांसाठी ) घेऊन यावे,
भर्ती प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यन्त दररोज सुरु राहिल,या भरतीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव, डॉ. संजय गौतम सर, सह सचिव श्री केदार गौतम ,प्राचार्य श्री. मुकुंदा राऊत तसेच
भरती अधिकारी .श्री महेशकुमार सरतापे, श्री गोरख जगताप यांनी केले आहे



