pub-7425537887339079
ब्रेकिंग

पाचोड–पैठण–बिडकीन बसस्थानक परिसरात नो पार्किंग वाहनांवर संयुक्त कारवाई

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.10
पाचोड, पैठण व बिडकीन बस स्टँड परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी. महामंडळ वाहतूक शाखा व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने (दि.9) रोजी विशेष कारवाई केली.
बसस्थानकाच्या आतील परिसरात व नो पार्किंग क्षेत्रात उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकली व इतर वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागणार असून वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पी.आय. आनंद झोटे, एस.आय. सुधाकर कोळेकर, हवालदार प्रमोद काळे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
बसस्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि अपघात टाळणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

(छायाचित्र : पाचोड बसस्थानक परिसरात नो पार्किंग वाहनांवर कारवाई करताना वाहतूक शाखेचे कर्मचारी.)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे