जिल्हा परिषद शाळा देळेगव्हाणच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी प्रकाश कापसे; उपाध्यक्षपदी सागर बनकर अनेक वर्षांपासून रखडलेली निवड प्रक्रिया अखेर पूर्ण; सात सदस्यांच्या बहुमताने निवड

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
देळेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली निवड प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश प्रभाकर कापसे, तर उपाध्यक्षपदी सौ. सागर परमेश्वर बनकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण समितीच्या ११ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सात
सदस्यांनी बहुमत दर्शविल्याने अध्यक्षपदी प्रकाश कापसे, तर उपाध्यक्षपदी सौ. सागर बनकर यांची निवड निश्चित झाली. दरम्यान, उर्वरित चार सदस्यांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
नवनिर्वाचित शालेय शिक्षण समितीमध्ये अध्यक्ष प्रकाश प्रभाकर कापसे, उपाध्यक्ष सौ. सागर परमेश्वर बनकर यांच्यासह सौ. सोनाली डिंगाबर शेवाळे, सचिन दत्तू नीलक, सौ. अलका राजू पंडित, सौ. शांता सुदाम कापसे आणि भगवान अर्जुन सुरवंशी यांचा समावेश आहे.
या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे मोतीराम बनकर, समाधान
बनकर, डॉ. शरद कापसे, सुनील बनकर, कृष्णा बनकर, अर्जुन नीलक, विठोबा पंडित, गणेश नीलक, विजय बनकर, उद्धव कापसे, योगेश कापसे, दगडूबा बनकर, विकास नीलक यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल आणि शाळेच्या विविध समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



