pub-7425537887339079
ब्रेकिंग

संध्यास्त इंद्रधनू:-संध्यामग्न विरक्तीची वृतस्थ कविता– डॉ प्रभाकर शेळके,

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.19

कवि गोविंद वायाळ मु.पो.वायाळ पांगरी बु.ता मंठा. जि.जालना.पुणे स्थित.”नियतीनं अवेळीच हंगाम खुडून नेला की उरते केवळ जगण्याची उनगवाडी अन् दुःख गर्भाशीण होतं.मग,फक्त दिवस जातात.दिवस सरत ही नाही आणि भरतही नाही”(पृष्ठ ७३)ही ओळ मनपिळवटून
टाकते.तिथं खरी कविता जन्म घेते.कवी शब्द श्वासा गणिक कविता होऊन जगतो.त्याचं नितळ मनफुलपाखरू
होऊन उडत राहतं आठवांच्या फांदीवर.शब्द थव्यांच्या कविता होऊन जातात.क्षणोक्षणी वैरानं माळरानी.कवी उदास होऊन डोळ्यांच्या कडा ओलावत लावितं राहतो मनाच्या तेलवाती.कवितेची अर्पणपत्रिका “संध्या,तू खानदानी जन्मजात निर्मोही..तरी,वृंदावनीच्या तुळशी मंजिरींचा सुंगध गेलीस सोबत घेऊन ‘जप’म्हणून माझ्या तळहाती सांजवातीचा तेलदिवा ठेवून..! गुरुवर्यांचा चरणस्पर्श घेत हा शब्द घनव्याकुळ होऊन अर्पण करतो.
‘संध्यास्त इंद्रधनू’,गुरुच्या चरणी.उराशी कवटाळून गहिवरल्या भावनेनं गळाभेट घेतं गुरू आशीर्वाद देतात.
आई बाबांच्या चरणी नतमस्तक होतं.पुण्याईने दुर्दम्य इच्छाशक्तीने चांगला माणूस झाल्याची ग्वाही अन् आई बापाचं स्वप्न श्रीमंत करतो.हा अद्वैत अदम्य् इच्छेचा निर्लेप नितळ श्रध्देय रूप कवीचे दिसून येते.कवी गोविंद वायाळ हे एक निस्सीम श्रद्धेय ज्ञानभक्तीचे प्रतिक आहेत.आम्ही
कवितेचं देणं लागतो.या नितळ भावनेतून रक्तवाहिनीची
कविता होऊन होऊन जगणं म्हणजे काय असते?श्रध्देय गुरू प्रा.जयराम खेडकर कवितेचा मर्मग्राही आस्वादक स्वानंद कवितेविषयी लिहितात”नुसती शब्दांची शृंखला नसते कविता,ओले काळीज जाळणारी ती आग असते.”काट्यांची कुरूप होऊन दुःख देहभर सलते तेव्हा खरी कविता येते.कविता असते आत्म्याचा शब्द,संचित जीवनाअनुभवाच्या दुःखाचा घनव्याकुळ उद्गगार असते कविता.सर्वात चांगली कविता लिहिणारा कवी त्या क्षणी सर्वात चांगला माणूस असतो.केवळ शब्द आणि अर्थ याची कविता होत नाही,तर ती असते सर्वांग सुंदर स्वप्न, सर्वांत चांगल्या माणसाच्या इच्छाशक्तीचं!..या शृखलेत गोविंद वायाळ यांचं अढळ स्थान आहे.संत तुकोबांच्या भूमिकांत वंशपरंपरेचा कवि म्हणून वाचक रसिकांना नोंद घ्यावी लागेल, कारण अनुभवांचा शब्दोच्चार म्हणून ही. कविता प्रकट होते(शुभेच्छापर)ही संध्यामग्न पुरुषांची लक्षणे.सृजनशील स्नेहाळू भावनेचा ओलावा या काव्यातून दिसून येतो.रानशिवारातला एक अनामिक नितळ निर्झर वाहत राहावा इतक्या तरलतेने ही कविता संध्यामग्न होऊन वाहते आहे.कवि अंतःकरण इतके आर्त
झाले आहे की, कवितेची सृजन ओळ खोलवर ओल देऊन जाते.जसे”स्वप्नात तिच्या आला,एक शब्दवेडा सांगत राहिला तिला रंग दिवान्या कहाण्या/सकाळी तिच्या भोवती होता चंद्रचुरा सांडलेला (पृष्ठ ०१)ही अलवार कोवळी मनमुग्ध मनाची ओळ कविच्या मनाची अंभगीत लयताल आहे.पुढे चिंब पावसात भिजताना, माझ्या स्पर्शातील किरण,मी माझा असतो तेव्हा तुझाचं असतो,शिरस्त्याचे बंध झुगारून, स्वप्नातील ओल काळीजभर होते, स्पर्श व्हावा असा की,या कवितेमधून एक निस्सीम सृजनशील भावकविता आपल्या सखीच्या पैंजणी ध्वनीची एक लय घेऊन येते.देहाच्या अंतरगी सखीला आपल्या मनाच गोडगुलाबी गुपीत मनाच्या कुपीत आतरदानी गत जपावं इतकं निष्ठावंत भूमीनिष्ठ भाग्यवंत होऊन ही कविता संयत तरलतेने येते.जसे
“स्पर्श व्हावा असा की,
निखळून पडावे बंध सारे
पापुद्रे निघावेत काळजाचे
उकलत जावे सारे पदर
अन्
उन्मळून पडावे मुळासकट
कुण्या गंधार्त स्मृतीत”….(पृष्ठ ०७) काव्य हे मनातून खोलवर झिरपत राहते.तिच्या आठवणीचा नितळ झरा वाहत राहतो.कवि मन एक नितांत निवांत मनातून अशांत पाखरू होऊन फक्त ध्यानमग्न अवस्थेत एखाद्या ओढ्याच्या काठावर फक्त तिच्या अमोघ वाणीचा एखादा स्वर कानावर येईल.तीने तिचं अहेव लेणं मिळवलं.तो एक अनामिक ओढीनं फक्त तिची वाट पाहतो आहे.तिने सारं सर्वस्व अर्पण केलं.ती आहुती म्हणून त्याच्या चरणाशी लिनं झाली.तो तिच्या मोहात अजूनही फक्त सुगंध होऊन तिच्या चाहुलीनं तो चावळला आहे.हा साक्षात परमानंद मनाचा हुंकार देत तिच्या मोहाची कविता होऊन जगतो आहे.”निळ्या नवलाईतील नितळ लेणं, दुःख वाटून घेता येतं, राजबिंड्या वैभवाला बिलगली हिरवाई,राजवर्खी रूपाला नक्षत्राचा जर,रंग उधळले असे तू फुललो,
बहरलो,मोहरलो, तुझ्या निर्देही असण्यातील रंग”
ही कविता इतकी तलम रेशमी बंधाची आहे.वाऱ्यावरती हळूवार स्पर्शून सारी स्वप्न फुले आभाळभर व्हावीत अन् या आभाळरंगात युगानुयुगाचा प्रेमानूबंधाचा ढगांनी सप्तरंग काढावेत इंद्रधनूचे इतकी अनामिक ओढीची ही प्रेमळ कविता जसे”तुझ्या निर्देही असण्यातील रंग
माझ्या सदेही/जगण्यात उतरले
असे की,
इंद्रधनू उमटले अस्मानी माझ्या..(पृष्ठ १३)
कवीवर्य गोविंद वायाळ जी यांच्या शब्दकळेने एक आर्त हाक जी केवळ कवितेचा मर्मग्राही अनुबंध होऊन जाते.
प्रस्तावनेत डॉ रणधीर शिंदे लिहितात “गोविंद वायाळ यांची कविता हे एक व्याकुळ प्रीत स्मृती काव्य आहे.ती रूप संपन्न आणि रुप सुंदर आहे.तसेचं ती कोणती देहाची
आहे.गौरंगी कांतीची ती चंद्रवेलीरूपी आहे.तिच्या आठवणी सालस आहेत.ती अखंड आणि अमर्यादित आहे.तिचे वैदेही बंध ‘त्याला’ प्रकाश मान करणारे आहेत.या प्रेमकथेतील ती हळदीवी आहे..मात्र धुंद अशी ही अंभग प्रेमकहाणी मध्येचं दुभंगते..(प्रस्तावना)कळी काळाच्या निखळ कच्चखापी दगडी वाड्याचे अवशेष भूईकंपीत व्हावे आणि मनाने एक हळवे फुलपाखरू होऊन शोधावेत आठवांचे क्षणक्षणीचे मन मुक्त श्वास..
“दुःखाचे प्रपाती उन्माद/निरंतर कोसळतात तेव्हा
कातळ केले स्वतःला तरी/काळजावर प्रस्तर प्रहार
अखंड होत असतात.
सरणफुलांचे तारे होतात/अन् चंद्रच काळवंडतात”
(पृष्ठ.५२)ही उध्वस्त स्वप्न प्रदेशातील कविता मनाचे विवर
व घनघोर अंधार शब्द पाकळ्या ही कविता देऊन जाते.
कवी गोविंद वायाळ यांची कविता निसर्ग प्रतिमा प्रतिकातून व्यक्त होताना ती ओंजळभर सुखाचा स्वानंद देते की,प्रेम ही एक मानवी मनाची भावस्पर्शी स्पंदनाची बोली होऊन जेव्हा येते तेव्हा ती जणू क्षितीजभर आपले रंग उधळत असते.हाच कवीस्नेह धागा हा अथांग होऊन जातो हे या कवितेचे श्रेयस आहे.बर्लब(पाठराखण)प्रा प्रतिभा सराफ लिहितात “कवी गोविंद संध्यास्त इंद्रधनू या अप्रतिम शीर्षकाचा कवितासंग्रह.आपण केवळ कल्पना करतो.परंतू आपली कल्पना कवितेतून सत्यात उतरलेली पाहतो तेव्हा आश्चर्यचकित होतो.निसर्गाच्या भव्य पटलावरच्या सप्तरंगात या कविता आपल्याला वास्तवात प्रेमानुभवाने भिजवून टाकतात.प्रेयसीच्या भेटीची ओढ,तिची प्रत्यक्ष भेट, तिच्या तनाचा मनातून वेध आहे.
या सर्व कवितांत वापरलेल्या उपमा अलंकार, प्रतिमा,प्रतीकं, लाजवाब आहेत.’हुळहुळती लाज, स्पंदनातील ओल,कंचनी देह,राजवर्खी रुप,गौरगी कांती,
कातळकोरीव शिल्प,इ.उदा देते (प्रतिभा सराफ, मुंबई)
कवीवर्य गोविंद वायाळ यांच्या सृजनशील भावनेचा आदर आहेच.अतिशय आशय संपन्न कविता आली आहे.मुखपृष्ठ
डॉ गिरीश चरवड, पुणे यांचे आहेत.प्रा जयराम खेडेकर सरांनी हा अप्रतिम कवितासंग्रह साक्षात देखणा केला आहे.म्हणून मनस्वी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
=============================

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे