आरक्षण उपवर्गीकरणास स्थगिती मिळावी यासाठी उमेश सुतार चे उपोषण सुरू

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17
जाफ्राबाद. येथे आरक्षण उपवर्गीकरण थांबवावे यासाठी राज्य सरकार विरोधात आमरण उपोषण उमेश सुखदेव सुतार रा.काळेगाव ता. जाफ्राबाद जि जालना यांचे तहसील कार्यालय जाफ्राबाद येथे उपोषण सुरू आहे. उपोषणार्थी यांच्याशी संवाद साधला असता,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत (SC) कॅटेगिरीत येणाऱ्या ५९ जातींना १३% आरक्षण दिलेले आहे.एक मातंग समाजचे काही नेते आरक्षण उपवर्गीकरण करा असे म्हणत असले तरी इतर कोणीच उपवर्गीकरण करा असे म्हणत नाही, त्यांतच सरकारने बदर समिती स्थापन करून अ.ब.क.ड.च्या नावा खाली जो काही मातंग बौद्ध समाजामध्ये वाद लावला आहे तो तात्काळ थाबविण्यात यावे. आणि आरक्षण उपवर्गीकरणास फक्त बौद्ध समाजाचा विरोध नसून ५८ जातीचा विरोध आहे, तरी सरकारने एका जातीचा विचार न करता ५८ जातीचा पण विचार करावा. ५९ पैकी एका जातीच्या काही नेत्याच्या मागणी वरून ५९ जातीची अ.ब.क.ड. मागणी नसतांना शासनाने जबरदस्ती घाट घालत आहे,त्यातही असंवैधानिक बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता शासन जबरदस्तीने अ.ब.क.ड.घाट घालत आहे. यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देऊन जाफ्राबाद तहसील कार्यालय समोर दि.१६/०६/२०२६ रोजी वार मंगळवार पासून आमरण उपोषणास बसलेले आहे. दरम्यान,विविध जाती धर्माचे पदाधिकारी,पक्ष,संघटना,आणि सामाजिक कार्यकर्ते उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवित असुन सरकार जर माघार घ्यायला तयार नसेल तर विविध जाती धर्माचे सामाजिक कार्यकर्ते,पदाधिकारी आणि समाजसेवक स्वयं प्रेरणेने आमरण साखळी उपोषणाला बसणार असल्याचे म्हणत आहेत.



