जालना शहर महानगरपालिका – महिला व बालकल्याण विभाग स्वसंरक्षण तथा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण समारोह संपन्न!

जालना/प्रतिनिधी,दि.11
जालना शहर महानगरपालिका आयुक्त मा. अंजलीजी शर्मा* यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. संध्या संजय देठे यांच्या संकल्पनेतून दि. १ ते १० सप्टेंबर दरम्यान मोफत शिवकालीन क्रीडा व सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या १० दिवसात जालना शहरातील तब्बल ३००० महिला व मुलींनी याचा लाभ घेतला. दि. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या समारोप सोहळ्यात मुलींनी लाठी-काठी, तलवारबाजी व सेल्फ डिफेन्सची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी सर्व प्रशिक्षकांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी उपमहापौर मा. श्री. राजेश राऊत यांनी घोषणा केली
“पुढील काळात जालना मनपा महिला व बालकल्याण विभागामार्फत वर्षभर मोफत सेल्फ डिफेन्स व शिवकालीन मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात हे प्रशिक्षण पोहोचवणार आहोत.”
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित मान्यवर
प्रमुख उपस्थिती – आयुक्त मा. श्रीमती अंजली शर्मा
विशेष निमंत्रित – माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका मा. श्रीमती संगीता गोरंट्याल
नगरसेविका मा. श्रीमती सुशीला भास्कर दानवे
नगरसेवक मा. श्री. अक्षय गोरंट्याल
नगरसेविका मा. श्रीमती दर्शना ताई झोल-खोतकर
नगरसेविका मा. श्रीमती श्रद्धा साळवे
नगरसेवक मा. श्री. विरेंद्रजी धोका
नगरसेवक मा. श्री. सिद्धिविनायक मुळे
उपायुक्त मा. श्रीमती नंदा गायकवाड
समाज विकास अधिकारी श्री. आनंद त्रिभुवन
विद्युत अभियंता श्रीमती कोमल गावंडे
महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्रीमती प्रमिला मोरे
व सर्व अधिकारी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

