pub-7425537887339079
ब्रेकिंग

गोदावरी नदीच्या महापुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पिकविमा आणि नुकसान भरपाई मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0 4 7 7 1 3
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी, दि.7

राज्याचे माजी मंत्री मा.राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार आज राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने गत वर्षी गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना त्वरित पिकविमा आणि शासकीय नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.

गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन शेतपिकांच्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून कोरडवाहू (जिराईत) पिके: ₹१८,५०० प्रति हेक्टर,हंगामी बागायत पिके: ₹२७,००० प्रति हेक्टर,कायमस्वरूपी बागायत पिके: ₹३२,५०० प्रति हेक्टर,जमीन वाहून गेल्यास: ₹४७,००० प्रति हेक्टर रोख मदत आणि मनरेगा (NREGA) द्वारे जमीन सुधारण्यासाठी अतिरिक्त सहाय्य., पिकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त ₹१०,०००,जनावरांचा मृत्यू झाल्यास ₹३२,००० प्रति जनावर मदत,गाळ साचलेल्या किंवा खचलेल्या विहिरींच्या स्वच्छतेसाठी ₹३०,००० ची मदत जाहिर करण्यात आली होती.त्यानुसार नुकसानग्रस्त पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत करण्यात यावी.

अंबड तालुक्यातील अतिवृष्टी व गोदावरी नदीच्या महापुराच्या पाण्यामुळे शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतावर येऊन नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत.शासनाच्या ओदशान्वये शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना दिलेल्या आहेत.परंतु अद्याप शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही.

परभणी जिल्ह्यातील पाथरी,सोनपेठ,गंगाखेड आदी गोदाकाठच्या गावांतील महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविमा मिळालेला आहे.त्याच धरतीवर अंबड तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील महापुरामुळे बांधीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविमा मदत त्वरीत देण्यात यावी.नसता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात यईल याची प्रशासनाने नोंद घेणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मा.सतीशभाऊ टोपे,पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.संजय काळबांडे, तालुकाध्यक्ष सतीशदादा होंडे, ख.वि.संघाचे चेरमन बाळासाहेब नरवडे, समदभाई बागवान,अरुणराव कळकटे,शिवप्रसाद चांगले,न.प.गटनेते अर्जुन भोजने,नगरसेवक संदीप खरात, नाजा हाश्मी,ऍड अफरोज पठाण,ऍड.अमोल लहाने, ऍड.सचिन पवार,दादासाहेब लटपटे, मोहसीन हस्मी, सलीम बागवान, सलीम बागवान,रामेश्वर काळे, दत्ता भोकरे, बाळू उढाण,सूर्यकांत मोताळे, सचिन पवार, शिवाजी गायकवाड,तुळशीदास पटेकर, प्रकाश पटेकर, अण्णासाहेब कणके, विश्वंभर गारुळे, जीवन मगरे, विनोद सोळुंके, पाशा पठाण, दीपक बिडवे, लक्ष्मण उघडे, संजय देवगिरे, दादासाहेब लटपटे, आनंद मगरे, राम झिंजुर्डे, अशोक काळबांडे, सुदाम राठोड, रवींद्र चेपटे, सतीश चेपटे,भरत गुळवणे, सचिन काळुसे, मुकुंद खाडे, जयराम गावडे ,अखिल पठाण,गणेश बर्वे,धर्मराज चेपटे,बाबासाहेब गायकवाड, दत्ता भोकरे, नरेंद्र वाघुंडे, शिवाजी खराबे,मोईन शेख, नितेश मरकड, गजानन सावंत, गणेश गर्जे,हसन पठाण, सुरज गुडे, सागर शिंदे, अनिरुद्ध उगले ,भरत मुळे, गजानन मिरकड यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व युवक मोठया संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 7 1 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे