pub-7425537887339079
ब्रेकिंग

‘हर घर तिरंगा’ आणि विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

 जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीत तसेच 13 ऑगस्ट 2026 पासुन विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे निमित्ताने जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा पदयात्रा, व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपट, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम / तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड जिल्हास्तरीय उपक्रम आणि प्रश्नमंजुषा होणार आहे. दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी प्रभात फेरी, सायकल रॅली, शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण, तिरंगा प्रतिज्ञा, सेल्फी अपलोड आणि वंदे मातरम् गीत गायन होणार आहे. दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी देशभक्तपर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर दि. 17  ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड करुन कॅन्डल मार्च काढणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना वेदना, सहन कराव्या लागल्या होत्या. तसेच विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला त्या काळातील इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मृती दिनानिमित्त शालेय-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, चर्चासत्राचे, व प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे