जाफराबाद आगारात 9 इलेक्ट्रिक बसेस दाखल, एकूण 25 इलेक्ट्रिक बस येणार

(दत्ता देशमुख) एसटी महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद आगारात 9 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून त्या दररोज जाफ्राबाद ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावत आहेत. ——————————————————————–
जुलै महिन्यात पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास जाफराबाद आगाराला 25 शिवाय बस मिळणार असून जाफराबाद जागा राहण्याचा फायदाच होणार आहे. जाफराबाद अगर महाराष्ट्र राज्यात नंबर एक वर असून उत्पन्नाच्या बाबतीतही पुढे आहे. येथील सर्व वाहक, चालक, हे तळमळीने काम करत असतात आणि उत्पन्न कसे वाढेल याकडे ते लक्ष देत असतात. त्यामुळे शिवाय बस पासून अधिक उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष दिले त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. उपस्थिती जालना आणि छत्रपती संभाजीनगर या बसचा प्रवास सुरू असून सध्या प्रवाशांना या बसा अधिक फायदा होताना दिसत आहे. आरामदायी तसेच वातानुकूलित असल्याने या बसचा प्रवाशांना अत्यंत फायदा होत असून प्रवासी कौतुक करत आहे … जाफराबाद तालुक्यातील प्रवाशांकडून इलेक्ट्रिक बसेसची मागणी सातत्याने होत होती. एसटी महामंडळाने ही मागणी पूर्ण केली असून 9 नवीन इलेक्ट्रिक बसेस जाफ्राबाद आगारात दाखल झाल्या असून त्या तीन दिवसापासून जाफराबाद ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावत आहेत. या इलेक्ट्रिक बसेससाठी जाफराबाद आगारात अत्याधुनिक चार्जिंग पाँईट उभारण्यात आले आहे. या बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी, प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवासाचा आनंद मिळत आहे. या बसेसला प्रवाशी मंडळीकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.




