pub-7425537887339079
ब्रेकिंग

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक संपन्न

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ साठी जालना जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 10 सप्टेंबर 2026 रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा देशपांडे, जालना यांच्या अध्यक्षेत पार पडली.
या बैठकीत शासनाने दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार आगामी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची मंडळे निवडण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत समितीमध्ये चर्चा झाली.
यावेळी बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव शिवाजी गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकणी, जिपच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री, गजानन पडूळ, संपदा कुलकर्णी आदीची उपस्थिती होती.
समितीने गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचा विचार करून शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे परीक्षण करण्याबाबत चर्चा केली.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, महिला व युवकांचा सहभाग तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचा प्रभावी माध्यम म्हणून साजरा व्हावा, यासाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांची जिल्हास्तरावर निवड करून त्यांची शिफारस करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीने संबंधित मंडळांच्या कामकाजाचे शासनाच्या निकषांनुसार मूल्यमापन करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची मंडळे निश्चित करावीत व त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

**

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे