pub-7425537887339079
ब्रेकिंग

विना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई, ५ लाखांचा ट्रॅक्टर जप्त

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

टेंभुर्णी, ता. जाफ्राबाद – विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकावर टेंभुर्णी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०२.०५ वाजेच्या सुमारास मौजे टेंभुर्णी ते जाफ्राबाद रोडलगत मदिना मशिदी समोर संशयितरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता, एक सोनालिका कंपनीचा DI42RX मॉडेलचा ट्रॉलीसह ट्रॅक्टरमध्ये सुमारे ०१ ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी लागणारी शासनाची रॉयल्टी पावती किंवा कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर व वाळू असा एकूण ५,०६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे गुरनं १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) सह खान व खनिज अधिनियम कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक सलमान पठाण रा. दत्तनगर टेंभुर्णी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. ११४७ देशपांडे हे करीत असून, गुन्हा पोहेका १२३० चौधरी यांनी दाखल केला आहे.

टेंभुर्णी परिसरात अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे