pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद जागतिक मिरची हब

कोट्यवधींची उलाढाल, रोज ५०० टनांहून अधिक हिरव्या मिरचीची खरेदी-विक्री , जाफराबादच्या मिरचीला परदेशातील बांगलादेश, श्रीलंका, सौदी अरेबियामध्ये मागणी

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

जाफराबाद शहरातील भोकरदन रोडलगत पुनर्वसन परिसराच्या बाजूला दहा एकरातून अधिक जागेवर भरत असलेले हिरव्या मिरचीचे मार्केट सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. दररोज ५०० टनांहून अधिक हिरव्या मिरचीची खरेदी-विक्री होते. त्यामुळे जाफराबादची ओळख राज्यातील प्रमुख, मोठ्या हिरव्या मिरचीच्या बाजारपेठांपैकी एक म्हणून निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून व्यापारी येथे येतात. येथून बांगलादेश, श्रीलंका, सौदी अरेबिया, नेपाळसह विविध देशांत हिरवी मिरची पाठवली जाते. मोठ्या आवक-जावकमुळे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापारी सांगतात.

या बाजारात सुपर, मीडियम, गुंटूर, तेजस्विनी, सिमला, तलवार, शारकेन, घेवडा, बिलाडोर, तेजाफोर अशा विविध जार्तीची मिरची विकली जाते. शेतकऱ्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होते. एका ट्रकमध्ये साधारण १०० ते १५० क्विंटल मिरची भरली जाते. दररोज ५० ते ६० मोठ्या ट्रकने मिरची देशातील विविध भागांत, परदेशात रवाना होते. त्यामुळे जाफराबाद बाजारपेठेला विशेष महत्त्व मिळाले आहे. जाफराबादमधून बांगलादेश, श्रीलंका, सौदी अरेबिया, नेपाळ येथे मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

जाफराबाद शहरातील मिरची बाजारात मोठी उलाढाल होत आहे.
__________________ चौकट :-
आगामी काळात मिरचीचे दर वाढतील, अशी अपेक्षा

‘मिरचीचे रोपे लावल्यापासून तोडणी पर्यंत एकरी मोठा खर्च येतो. रोपांची किंमत,

लागवड, खत-औषधे, पाणी, मल्चिंग आणि तोडणीचा खर्च यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या सुपर मिरचीला तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दर मिळत असला तरी हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहे. मिरचीला किमान सात ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाल्यास उत्पादकांना काहीसा फायदा होईल. आगामी काळात मिरचीचे दर वाढतील, अशी अपेक्षा आहे.’

रघुनाथ पंडित, मिरची उत्पादक शेतकरी, देऊळगाव उगले
__________________
दिल्ली, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, सुरत, कोलकाता, चेन्नई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, आग्रा या शहरांतही येथील मिरची पाठवली जाते. त्यामुळे ही बाजारपेठ स्थानिक मयदित राहिली नाही. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय बाजाराशी ती जोडली गेली आहे.

निमखेडा खुर्द, हिवराबळी, माहोरा, खासगाव, वरूड बु., कोनड, आंबेगाव, सिपोरा अं. या गावांमधून शेतकरी मिरची विक्रीसाठी जाफराबादला येतात. भोकरदन, सिल्लोड येथूनही आवक होते. मराठवाडा-विदर्भातील विविध भागांतून मिरची येते. चांडोळ, घाड, म्हसला, दुधा यांसह बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर येथील उत्पादकही माल घेऊन येतात. मिरची खरेदीसाठी जाफराबाद, टेंभुर्णी, जालना,

आवकेनुसार कमी अधिक दर

जाफराबाद बाजारात सुपर मिरचीला साधारण ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये, मीडियमला सुमारे ३ हजार रुपये, गुंटूरला २ हजार ते २ हजार ५०० रुपये, तर तलवार मिरचीला सुमारे ३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. इतर वाणांच्या मिरचीचे दरही बाजारातील मागणी आणि आवकेनुसार कमी-अधिक होत आहेत. दररोजच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा याचे नियोजन करणे अवघड जात आहे.

छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा,

चिखली, देऊळगाव राजा, खान्देशातील जळगाव-मलकापूरसह राज्यातील विविध भागांतील व्यापारी मोठ्या संख्येने दाखल होतात. बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होते. जाफराबाद शहरातील हॉटेल, ढाबे, कापड दुकाने, आठवडी बाजार, इतर व्यवसायांनाही अप्रत्यक्ष फायदा होतो. बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापारी, शेतकऱ्यांमुळे शहरातील ग्राहक संख्या वाढली आहे. मोठी उलाढाल होत असली तरी मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित उत्पन्न पडत नसल्याचे चित्र आहे. लागवडी पासून तोरणीपर्यंत मोठा खर्च होतो. त्या तुलनेत दर कमी मिळतो. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून काढणे अप कठीण जात असल्याचे शेतकरी सांगतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे