उरण तालुक्यातील आरोग्य विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यां अनास्थे मुळे उरण मधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर गेले आहे. कोप्रोली केंद्रात डॉक्टर आणि आरोग्य सेविका व इतर कर्मचारी अशी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उरण ग्रामीण भागातील हजारो गर्भवती महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार अवघ्या तीन आरोग्य सेविकांवर आहे.
उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरणच्या पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र मागील आठवड्यात उद्भवलेली पाणदिव्यातील डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक उणिवा समोर आल्या आहेत.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी ३, महिला आरोग्य परिचारिका २, आरोग्य सेविका २६, शिपाई २ आदी ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. मात्र यापैकी वैद्यकीय अधिकारी २, महिला आरोग्य परिचारिका १, आरोग्य सेविका २३, शिपाई २ अशी एकूण २७ पदे रिक्त आहेत.
रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे येथील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णावर होत आहे.रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
कोट (चौकट):-
शासना कडे रिक्त पदा बाबत यापूर्वी ही पाठपुरावा करण्यात आला आहे.मात्र कर्मचारी यांची भरती होत नाही.कोप्रोली आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी दरमहा होणाऱ्या प्रत्येक बैठकीत मागणी केली जाते.
निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी साजरा.
1 day ago
खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार.
1 day ago
एससी उपवर्गीकरणाविरोधात जाफ्राबाद येथे २८ जुलै रोजी विराट जनआक्रोश मोर्चा समन्वय समितीने केले एस.सी प्रवर्गातील नागरिकांना हजारोंच्या संख्येने सहभागाची होण्याचे
1 day ago
इंदेवाडी पाणी टाकी ते गोकुळधाम सोसायटी रस्त्याचे उद्घाटन संपन्न!
2 days ago
सासरच्या जाचाला कंटाळून जवयाने केली आत्महत्या
2 days ago
खासदार डॉ. कल्याण काळे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची जाफ्राबाद येथील साखळी उपोषणस्थळी भेट
2 days ago
झेडपी शाळा, रस्त्यांची दुरवस्था; लोकप्रतिनिधींवर गावकरी संतप्त निवडणुकांपुरतीच कामे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
2 days ago
बुलढाणा अर्बन शाखेत शाखा अधिकारी म्हणून वैभव कुलकर्णी रुजू. व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत.
2 days ago
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव; सुयश कॉलेज ऑफ फार्मसीत दीक्षांत समारंभ उत्साहात