राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू काळोसे यांचा जालना दौरा
जालना/प्रतिनिधी,दि.16
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य तथा भारत सरकारचे राज्यमंत्री दर्जा असलेले रवी रामू काळोसे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.
श्री. काळोसे हे दि. 16 नोव्हेंबर, 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने जालन्याकडे प्रयाण करून सायंकाळी 5.30 वाजता जालना येथे आगमन व मुक्काम करणार आहेत.
तसेच दि. 17 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेणार आहेत. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून, ते संबंधित बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता जालन्याहून परभणीकडे प्रयाण करणार आहेत.




