pub-7425537887339079
ब्रेकिंग

गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद /दत्ता देशमुख,दि.8

गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता तसेच जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच विविध शालेय पदांची जबाबदारी स्वीकारून शाळेचे दैनंदिन कामकाज यशस्वीपणे सांभाळले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत विविध विषयांचे अध्यापन केले. तसेच प्रार्थना, शालेय शिस्त, वर्गव्यवस्थापन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शालेय प्रशासन, शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी जबाबदारीने पार पाडलेल्या भूमिकांचे उपस्थित शिक्षकांनी कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापक म्हणून वैष्णवी साबळे, तर उपमुख्याध्यापक म्हणून सपना बरडे यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक दिनेश भाऊ दळवी उपस्थित होते.सूत्रसंचालन नितिन राठोड यांनी तर आभार प्रदर्शन पूजा पिसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विलास चिकटे, शोएब मदनी, कृष्णा गावंडे,राहुल शेरकर प्रभा भाग्यवंत, संविता गाडेकर, आशिष बनकर, प्रदीप कुदळे, नेहा फुके, साद शेख, निखिल साबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेतृत्व, शिस्त, जबाबदारी व निर्णयक्षमता विकसित करणाऱ्या अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे