बोरसे गुरुजींच्या प्रयत्नांना यश! दोन्ही रस्त्यांची कामे अखेर सुरू

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
करजगाव ते कल्याणी-कुकडी आणि जळगाव सपकाळ ते सुरंगळी या दोन रस्त्यांची रखडलेली कामे अखेर सुरू झाली आहेत. आम आदमी पार्टीचे जालना जिल्हा संघटन मंत्री श्री. कडुबा विनायकराव बोरसे (बोरसे गुरुजी) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, लेखी निवेदने आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला कामे सुरू करावी लागली आहेत.
कोणते दोन रस्ते?
1) करजगाव ते कल्याणी – कुकडी रस्ता (प्रजिमा-01)
कि.मी. 22/00 ते 27/00, 5 किमी. अंदाजे किंमत 3 कोटी 55 लाख 19 हजार रुपये. कंत्राटदार – राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., औरंगाबाद.
2) जळगाव सपकाळ ते सुरंगळी रस्ता व पुढे
3) (प्रजिमा-03), 17 किमी.6 कोटी 51 लाख 97 हजार कंत्राटदार – Courage Infr. Pvt. Ltd., जालना.
काय झालं होतं?
दोन्ही रस्त्यांची कामे अर्धवट होती. साईड शोल्डरवर काळी माती टाकलेली होती, तर एका रस्त्यावर साहिल शोल्डर चे काम केलेच नव्हते कामाची माहिती देणारा फलकही नव्हता. तो अजूनही लावलेला नाही. गावकऱ्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता.
गुरुजींनी दि. 04/06/2026 रोजी निवेदन देऊन दि. 01/07/2026 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला. दि. 26/06/2026 रोजी PWD अधिकाऱ्यांनी गुरुजींसोबत स्थळ पाहणी केली.
दि. 29/06/2026 रोजी PWD ने दोन्ही कंत्राटदारांना लेखी नोटीस (क्र. 424 व 425) काढली. त्यानंतर गुरुजींनी अंदाजे 9 कोटी 84 लाख रुपयांच्या अनियमिततेबाबत जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 29/07/2026 रोजी चौकशीचे आदेश दिले.
अखेर या सर्व पाठपुराव्यामुळे करजगावच्या दोन्ही रस्त्याच्या दोन्ही कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
गावकऱ्यांमध्ये आनंद
कामे सुरू झाल्याने करजगाव, कल्याणी, कुकडी, वाकडी,जळगाव सपकाळ, सुरंगळी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना बोरसे गुरुजी म्हणाले, _”हा विजय माझा एकट्याचा नाही, हा गावकऱ्यांचा विजय आहे. कागदावर आश्वासन मिळालं आणि आता प्रत्यक्ष काम सुरू झालं. काम पूर्ण होईपर्यंत आम्ही लक्ष ठेवून राहू.”_ नियमानुसार इस्टिमेट प्रमाणे कॉलिटी चे काम करून देण्याचे आश्वासन पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहे.


