pub-7425537887339079
ब्रेकिंग

लिंबाचे झाड पडून दुभती गाय ठार, “दुष्काळात तेरावा महिना” – शेतकरी कुटुंबावर संकट!

हिना" - शेतकरी कुटुंबावर संकट! शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी - बोरशे गुरुजी

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

ऑगस्ट 2026 – तालुक्यातील करजगांव येथील गरीब शेतकरी गंजीधर नानाभाऊ लोखंडे यांच्या शेतातील लिंबाचे मोठे झाड आज दुपारी अचानक पडून त्यांची दुभती गाय जागीच ठार झाली. या अपघातात अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आधीच मिरचीचे पीक हातचे गेले. “दुष्काळात तेरावा महिना” अशीच यांची अवस्था झाली आहे. उदरनिर्वाहासाठी काढलेल्या सावकारी कर्जाचा बोजा डोक्यावर असतांनाच घराचा चरितार्थ चालवणारी दुधाच्या पैशावर घर खर्च भागवणारी गाय देखील गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधीत घटनेचे जिओ टॅग फोटो घेण्यात आले असुन घटनास्थळी बोरशे गुरुजी, नाना लोखंडे, देविदास लोखंडे, सुरेश लोखंडे, अमोल लोखंडे, गणेश वानखडे,संतोषराव बोरशे, गजु महाराज इ.पंचांनी पाहणी केली या कुटुंबातील महिला शोकाकुल होत्या . संपुर्ण कुटुंब दु:खी झाले आहे.

शेतकऱ्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या प्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी आणि संबंधित गरीब शेतकऱ्याला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे