pub-7425537887339079
ब्रेकिंग

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2 

महाराष्ट्र शासनाच्यामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग व सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, त्यांचे कौशल्य विकसित व्हावे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सदर योजना राबविण्यातयेतअसूनयामध्ये 18 ते 35 वयोगटातील किमान 12 वी पास उमेदवारांना 11 महिन्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 12 वी करीता 6,000 रुपये आय.टी.आय./ डिप्लोमाकरीता 8,000 रुपये वपदवीवपदविधरकरीता 10,000 रुपये इतके विद्यावेतन डी.बी.टी.व्दारे थेट उमेदवारांच्या खात्यात अदा केले जाते. सदर योजनेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जालना यांनी 11 उमेदवारांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या 11 प्रशिक्षणार्थ्याना सतीश टोपे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,जालनावश्री. गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनायांच्याहस्ते प्रशिक्षणाकरीता नियुक्ती आदेशांचे वितरणदि. 1 जुलै 2026 रोजी करण्यात आले. यावेळी अध्यक्ष, सतीश टोपे, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी उमेदवारांचे अभिनंदन करून प्रशिक्षणाच्या कालावधीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले. बँकिंग क्षेत्रातील हे प्रशिक्षण त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देणारी आणि उद्योग क्षेत्राशी प्रभावी दुवा निर्माण करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या योजनेत नोंदणी करून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास अशितोष देशमुख, कार्यकारी संचालक, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सुरेश जाधव, सरव्यवस्थापक, अमोल बोरकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी, डॉ. अमोल परिहार, समुपदेशक, मॉडेल करिअर सेंटर, रविंद्र पाडमुख, जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे