ब्रेकिंग
जालना पोलीस दलातील श्री.ज्ञानदेव जुंबड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
0
4
1
4
9
6
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नती प्रक्रियेतंर्गत जालना येथील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले श्री.ज्ञानदेव भिमराव जुंबड यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली.
पदोन्नतीनंतर श्री.ज्ञानदेव जुंबड यांची नियुक्ती पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत या पदोन्नतीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पदोन्नती मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0
4
1
4
9
6


