pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले.

उरण मधील इतर ठिकाणी असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्ड वर कारवाई करण्याची मागणी.

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26

बेकायदा बांधकामांविरोधात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचा धडाकाच लावला आहे. उरण परिसरातील जांभूळपाडा येथील १ लाख २० हजार ४३७ चौ.मी. जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या कंटेनर यार्डवर सिडकोने हातोडा चालवला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. बेलोंडाखार लॉजिस्टिक पार्क येथे बेकायदेशीरपणे कंटेनर यार्ड उभारल्याची माहिती सिडकोला मिळाली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित राजपूत, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र – सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र उरण मध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण मधील नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे