pub-7425537887339079
ब्रेकिंग

राष्ट्रीय वकृत्व स्पर्धेतील विजेते अनिल भालेकर यांचा नागपूर येथे गौरव

वकृत्व कलेतील विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपद विद्यार्थ्यांना समर्पित!

0 5 4 1 9 0
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी, दि.5

भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई व जवाहर विद्यार्थी गृह नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत अंबड येथील शिक्षक तथा पत्रकार अनिल भालेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश संपादन केले आहे.
नागपूर येथे दोन आक्टोंबर रोजी समारंभ पूर्वक, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनिल भालेकर यांचा गौरव करत सन्मान चिन्ह,ग्रंथ, प्रमाणपत्र सहित सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील समस्या व संविधानिक उपायोजना या राष्ट्रीय परिसंवादात त्यांनी विषयानुसार विश्लेषण, अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करत नेत्रदीपक कामगिरी करत विजयाला गवसणी घातली. विविध गटात संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यापूर्वी देखील महाराष्ट्राचा युवा लेखक स्पर्धेत त्यांनी राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला होता. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “महाराष्ट्राचा युवा लेखक” हा किताब त्यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना वकृत्व कलेतील आवड निर्माण होण्याबरोबरच स्पर्धेत जिंकण्याची जिद्द निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील विजेतेपत्यांनी विद्यार्थ्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. नागपूर येथे आयोजित भव्य बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर, विधान परिषद सदस्य अँड. विश्वजीत वंजारी, मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अँड.धनराज वंजारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर किरण बिडकर, अँड. अभिमान हाके, सामाजिक कार्यकर्ता डॉ.वर्षा चौरे, प्राध्यापक डॉ.रमेश पिसे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद पटकावत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षक अनिल भालेकर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे