pub-7425537887339079
ब्रेकिंग

माजी सभापती एल. के. दळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरदन येथे माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3

शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन व मातीच्या गुणवत्तेचे अचूक परीक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भोकरदन येथे मा.सभापती एल. के. दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळेचे मा.सभापती एल. के. दळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून, जमिनीतील विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, पीएच मूल्य तसेच इतर महत्त्वाच्या घटकांचे परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन व पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच पीक उत्पादकतेत वाढ होऊन शेती अधिक फायदेशीर करण्यास हातभार लागणार आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना शेतकऱ्यांनी नियमितपणे मातीची तपासणी करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन केले. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आणि शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या शेतजमिनीची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे